शाहरुख खानच्या स्वदेस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला तरी त्यानं समीक्षकांची वाहवा मिळवली होती. या चित्रपटात शाहरुख सोबत गायत्री जोशी हिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गायत्रीनं तिचं निखळ हास्य आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
गायत्री जोशीचा जन्म 1977 मध्ये 20 मार्च रोजी नागपुरात झाला. गायत्रीने 1999 मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता. ती टॉप 5 मध्येही पोहोचली होती. 2000 मध्ये गायत्रीने जपानमध्ये मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
गायत्री जोशी जगजीत सिंग यांच्या 'वो कागज की किश्ती' या गाण्यात तसेच हंस राज हंस यांच्या 'झांझरिया' या गाण्यात दिसली. गायत्रीने अनेक ब्रँड्सच्या जाहिरातीही केल्या होत्या.
2004 साली प्रदर्शित झालेल्या स्वदेस या चित्रपटात शाहरुख सोबत काम करत ती लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला, अशातच गायत्रीला पुढे काम मिळू शकले नाही.
त्यानंतर तिने एका वर्षातच इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये एका मुलाखतीत गायत्रीने 'मला खात्री होती की मला येणाऱ्या काळात काही चांगल्या संधी मिळतील. मला अशा भूमिका करायच्या होत्या ज्या माझ्याशी निगडीत असतील. लोकांना माझे काम आवडलं होतं याचा मला आनंद होता. पण काही वेळा तुमच्या नियोजनानुसार गोष्टी होत नाहीत.'असं म्हटलं होतं.
स्वदेशच्या रिलीजच्या एका वर्षानंतर 2005 मध्ये गायत्री जोशीने उद्योगपती विकास ओबेरॉयशी लग्न केले आणि चित्रपट जगताचा कायमचा निरोप घेतला.
गायत्री जोशीचे पती विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रियल्टी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, ज्यांचे मार्केट कॅप सुमारे 30,000 कोटी रुपये आहे. 52 वर्षीय विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती 3.5 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच 28,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फोर्ब्सनुसार, तो सध्या 65 व्या क्रमांकाचा श्रीमंत भारतीय आहे.
गायत्री जोशी आणि विकास ओबेरॉय यांना विहान आणि युवा ही दोन मुले आहेत. पहिला मुलगा 2006 मध्ये आणि दुसरा मुलगा 2010 मध्ये झाला. गायत्री जोशी सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नाही.