Highest Paid Actors In Bollywood: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे एकापेक्ष एक स्टार आहेत, जे एका चित्रपटासाठी भरमसाठ फी घेतात. असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या फीमुळे चित्रपटाचे बजेट बिघडते. या यादीत आमिर खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे.
शाहरुख खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. प्रत्येक चित्रपट निर्मात्याला शाहरूखला त्याच्या चित्रपटात घेणं परवजत नाही. कारण एका चित्रपटासाठी तो 100 ते 150 कोटी रुपयांपर्यंत फी घेतो. (फोटो साभार: Instagram@iamsrk)
सलमान खान देखील निर्मात्यांकडून भरमसाठ फी घेतो. टायगर 3 या आगामी चित्रपटासाठी त्याने 130 कोटी रुपये घेतल्याची माहिती आहे. एवढ्या पैशातून एक अख्खा सिनेमा बनवला जाईल. (फोटो साभार: Instagram@beingsalmankhan)(फोटो साभार: Instagram@beingsalmankhan)
अक्षय कुमार गेल्या काही काळापासून बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकलेला नाही. मात्र त्याचा त्याच्या स्टारडमवर काहीच परिणाम झालेला नाही. आजही निर्माते त्याला भरमसाठ फी देऊन सिनेमात घेण्यास तयार आहेत. अक्षय कुमार एका चित्रपटात काम करण्यासाठी 80 ते 100 कोटी रुपये मानधन घेतो..(फोटो साभार: Instagram@akshaykumar)
आमिर खानची फी घेण्याची पद्धत वेगळी आहे. रिपोर्ट्सनुसार, तो एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपये घेतो. इतकंच नाही तर तो चित्रपट सुपरहिट झाला तर नफ्याच्या 75 टक्के रक्कमही घेणार, अशी अट तो निर्मात्यांसमोर ठेवतो. (फोटो साभार: Instagram@aamir_khan.fan)
रणबीर कपूर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे बहुतेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतात. आपल्या नव्या अॅनिमल चित्रपटासाठी त्याने 70 कोटी रुपयांची फी घेतल्याचे सांगितले जात आहे. (फोटो साभार: Instagram@ranbirkapooronline)