करण जोहर बॉलीवूडच्या अशा प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक आहे, जो त्याच्या चित्रपटांसोबतच अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करण जोहरने विचित्र कपड्यांमधील त्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्याला जोरदार ट्रोल केलं आहे.
हे फोटो शेयर करताना करणने कॅप्शनमध्ये लिहिलंय की- 'सर्वात भव्य प्रवास... सर्वोत्तम आदरातिथ्य, उत्तम भोजन आणि उत्तम ऊर्जा तुम्हाला हॉटेलमध्ये मिळू शकते.' त्याने सूर्यगड हॉटेलला टॅग करून त्याच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. करणने पुढे लिहिले- 'सर्व लोकांचे आभार ज्यांनी हा मुक्काम इतका खास बनवला'.
करणची शाल पाहिल्यानंतर लोकांना शोलेचे ठाकूर आठवले. अनेक युजर्सनी कमेंट करत म्हटले- 'ये हाथ मुझे दे दे ठाकूर.' एका यूजरने लिहिले - 'बिचाऱ्याचा स्वेटर फाटलाय, कोणी त्याला सांगा'. दुसर्याने लिहिले - 'तौबा-तौबा सारा मूड खराब कर दिया'. आणखी एका युजरने लिहिलंय की, 'या गरीबाला छान स्वेटर देऊन मदत करा'.