मराठातील एक गोड अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखलं जातं. सायली नेहमीच बिनधास्त आणि हसत खेळत दिसून येते.
मात्र आज या अभिनेत्रीवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. अभिनेत्रीने आपली सर्वात जवळची व्यक्ती गमावली आहे.
अभिनेत्रीने आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून ही माहिती सर्वांना दिली आहे. सायली संजीवने वडिलांसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोबतच अभिनेत्रीने भावुक करणारी पोस्ट लिहिली आहे. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं... असं म्हणत अभिनेत्रीने आपलं दुःख व्यक्त केलं आहे.
सायली संजीव आपल्या आवडिलांच्या फारच जवळ होती. ती सतत आपल्या वडीलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती.
अभिनेत्रीने ही बातमी शेअर करताच. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अभिनेत्री सायली संजीवचा नुकताच 'झिम्मा' हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्यामध्ये तिचं काम खूपच पसंत केलं जात आहे.