यात महत्त्वाची बाब म्हणजे दीपिकाची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे. शोएबन स्वत: पोस्ट लिहित ही माहिती दिली.
दीपिकाला डॉक्टरांनी जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील तारीख दिली होती. परंतु दीड महिना आधीच तिची डिलिव्हरी झाली.
दीपिकानं जानेवारी 2023मध्ये प्रेग्नंट असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. दोघांनी मॅटरनिटी फोटोशूट देखील केलं होतं.
दरम्यान दीपिका कक्कडने खुलासा केला होता की, तिने तीन महिने प्रेग्नंसीची बातमी मुद्दाम लपवून ठेवली होती. कारण याआधी तिचा गर्भपात झाला होता.
डॉक्टरांनी प्रेग्नंसी काळात तिला सर्वाधिक काळजी घेण्यास सांगितलं होतं. त्यानुसार आता दीपिका आणि शोएबच्या घरी मुलाचं आगमन झालं आहे.