Navratri 2021: Sara Ali Khan ने घेतलं करणी मातेचं दर्शन; चुलीवर भाकरी थापतानाचे Photos झाले Viral
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या उदयपूरमध्ये आपल्या सुट्ट्या घालवत आहे. आता नवरात्रीचा सण आल्यामुळं तिने शहरातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेतलं. पाहा PHOTOS
नवरात्राच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचे देवी दर्शन घेतानाचे फोटो आणि तिने दिलेल्या शुभेच्छा viral होत आहेत.
2/ 8
मालदीवच्या सुट्टीनंतर सारा अली खान आता राजस्थानमध्ये उदयपूरला आली आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तिनं देवीचे आशीर्वाद घेत माता मंदिरातील फोटो शेअर केला आहे.
3/ 8
साराने मंदिराभोवतलचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये ती एका टेकडीच्या बाजूला बसून निसर्गाचा आनंद घेत आहे.
4/ 8
सारा अली खानसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूरचा तथाकथित बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठ देखील आहे. हा फोटो शेअर करताना तिने रोहन श्रेष्ठला टॅग केलं आहे.
5/ 8
या फोटोत सारा अली खान चुलीवर भाकरी करताना दिसत आहे. तिनं याचा व्हिडिओ insta story वर शेअर केला आहे. भाकरी भाजताना फार मजा येतेय, असं तिने म्हटलंय.
6/ 8
सारा अली खानच्या हिंदू देवदर्शनावरून काही महिन्यांपूर्वी तिला ट्रोल केलं गेलं होतं. पण या अभिनेत्रीने अशा टीकाकारांकडे दुर्लक्ष केलं. पुन्हा एकदा तिने माता मंदिरात देवीचं दर्शन घेतानाचा फोटो शेअर केलाय.
7/ 8
या फोटोंमध्ये सारा श्री एकलिंग जी मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेली आहेत. पारंपरिक वेशात ती सुंदर दिसत आहे.
8/ 8
या ट्रिपमध्ये साराने उदयपूरच्या एका सरोवरात बोटिंगचा आणि नैसर्गसौंदर्याचाही आनंद घेतला आहे. (फोटो साभारः Instagram @saraalikhan95)