महेश भट्ट यांच्या सडक, गुमराह यासारख्या हिट सिनेमात संजय दत्तने काम केले आहे. 30 वर्षापूर्वी संजय दत्तनं जर महेश भट्ट यांचं ऐकलं असतं तर त्याचे करिअर अजूनही एका वेगळ्या उंचीवर असतं. महेश भट्ट यांनी संजय दत्तला एक सिनेमाची ऑफर दिली होती, पण संजयनं तो सिनेमा करण्यास साफ नकार दिला होता. या चूकीमुळेच हा सिनेमा आदित्य पंचोलीच्या हाती लागला आणि तो रात्रीत स्टार झाला.
महेश भट्ट यांनी 90 च्या दशकात काही सर्वोत्कृष्ट सिनेमे केले, त्यापैकी एक 'साथी' हा सिनेमा 20 सप्टेंबर 1991 रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाची कथा, गाणी आणि संगीतासोबतच कलाकारांचा अभिनयही उत्कृष्ट होता. या सिनेमाने आदित्य पांचोलीला लोकप्रिय केले. संजय दत्तने चूक केली नसती तर आणखी एक हिट सिनेमा त्याच्या खात्यात असता.
महेश भट्ट यांनी यापूर्वी संजय दत्तला या चित्रपटाची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी नकार दिल्याने आदित्य पांचोलीने मुख्य भूमिका साकारली आणि तो रातोरात स्टार बनला. IMDB च्या रिपोर्टनुसार, 'साथी' चित्रपटातील आदित्य पांचोलीची व्यक्तिरेखा 'स्कारफेस' या हॉलिवूड चित्रपटातून टोनी मोंटानापासून प्रेरित असल्याचे म्हटलं जाते.
या चित्रपटात पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटामुळे तो खूप लोकप्रियही झाला. या चित्रपटातील 'हुई आंख नाम आणि ये दिल मुस्कुराया' या गाण्यांना चांगलीच लोकप्रियता मिळवली होती.
महेश भट्ट यांनी दीपक तिजोरीलाही एका भूमिकेची ऑफर दिली होती, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर अभिनेते राजू श्रेष्ठ यांना कास्ट करण्यात आले.
'साथी' चित्रपटातील 'जिंदगी तलाश में हम मौत के कितने आ गये' हे गाणे आजही लाखो लोकांचे आवडते गाणे आहे. 'याराना यार का' हे गाणे लोकांच्या हृदयाच्या जवळच्या गाण्यापैकी एक आहे.