अभिनेता संजय दत्त आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी संजय दत्तचा अनोक अवतार समोर आलाय.
अभिनेता आता साऊथचा विलन होण्यासाठी रेडी झालाय. संजय दत्त राम पोथिनेनी यांच्या डबल इस्मार्ट या सिनेमात दिसणार आहे.
संजय दत्तच्या वाढदिवशी त्याचा सिनेमातील पहिला लुक रिलीज करण्यात आलाय. बंदूकीच्या गोळ्यांचं बॅकग्राऊंड म्युझिक पोस्टरमध्ये ऐकायला मिळतंय.
काळा सूट, आकर्षक चेहरा, फंकी हेअरस्टाइल, दाढी, हातात अंगठ्या, एक शानदार घड्याळ आणि हातावर वेगळाच टॅटू असा संजय दत्तचा लुक समोर आला आहे.
संजय दत्तबरोबर अभिनेता विजय सेतुपती देखील प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.