मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस आजवर आनंदी गोपाळ, टाइम प्लिज, डबल सीट, वाय झेड, लोकमान्य यांसारखे दर्जेदार मराठी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. मराठी नंतर त्यांनी हिंदीतही पाऊल टाकलं.
अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्यप्रेम की कथा हा सिनेमा अखेर 29 जून रोजी रिलीज झाला.
'सत्यप्रेम की कथा' ने सोमवारी 12 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 1.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे.आतापर्यंत या चित्रपटाने भारतात सुमारे 67 कोटी रुपये कमावले आहेत आणि जगभरातील 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे.
कार्तिक आणि कियाराची जोडी या सिनेमानिमित्त एकत्र पाहायला मिळाली. दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.
सत्यप्रेम की कथा सिनेमाचं एकूण बजेट 60 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. फॅमिली ड्रामा आणि लव्ह स्टोरी सिनेमात दाखवण्यात आली आहे. सत्यप्रेम की कथा सिनेमाचं एकूण बजेट 60 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. फॅमिली ड्रामा आणि लव्ह स्टोरी सिनेमात दाखवण्यात आली आहे.