साऊथ अभिनेत्री समांथा रूथ प्रभू मागील काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. पुष्पा सिनेमातील तिच्या आयटम साँगची चांगलीच चर्चा झाली.
त्यानंतर समांथाच्या प्रकृतीची अपडेट समोर आली. मधल्या काळात तिनं अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. मात्र तिचे सिनेमे फारसं नाव कमावू शकले नाहीत.
समांथाची सिटाडेल ही वेब सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. पण या वेबी सीरिजमुळेही देखील तिच्या करिअरवर फारसा परिणाम झालेला नाही.
सिटाडेलनंतर समांथा सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. समाथानं नुकताच एक नवा सिनेमा साइन केला होता.
नव्या सिनेमाचं अर्ध मानधन देखील घेतलं होतं पण तिनं अचानक मानधनाचे पैसे प्रोड्युसरला परत केले आहेत.
समांथा मागील अनेक महिने तिच्या प्रकृतीमुळे अस्वस्थ आहे. मोठ्या ताकदीनं ती काम करतेय. प्रकृती अपडेटमुळे समांथा कामातून ब्रेक घेत असावी असं म्हटलं जातंय.
सिटाडेलनंतर समांथा अभिनेता विजय देवरकोंडाबरोबर खुशी या सिनेमाचं शुटींग करत आहेत. येत्या 4-5 दिवसात हे शुटींग पूर्ण होईल. त्यानंतर समांथा कामातून पूर्णपणे ब्रेक घेऊन आपल्या प्रकृतीकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगण्यात येतंय.