भूमिका चावलाने सलमान खानच्या 'तेरे नाम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
'तेरे नाम' रिलीज झाल्यानंतर लोकांना वाटले होते की भूमिका चावला बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावेल, पण तसे झाले नाही.
भूमिका चावलाने 'तेरे नाम' नंतर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले, परंतु या अभिनेत्रीला तिच्या पहिल्या चित्रपटासारखे यश मिळवता आले नाही. भूमिका 'रन', 'सिलसिला', 'दिल ने जो भी कहा' सारख्या चित्रपटात दिसली होती.
बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर भूमिका चावलाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळली. त्यानंतर भूमिका चावलाने तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
काही वर्षांपूर्वी सुशांतच्या एम.एस धोनी. द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं होतं. तिने या सिनेमात सुशांतच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
चित्रपटांमध्ये प्रवेश केल्यानंतर, भूमिकाने योगा शिकण्यास सुरुवात केली आणि याचदरम्यान तिची योग शिक्षक भरत ठाकूर यांच्याशी भेट झाली. योगा शिकल्यानंतर काही दिवसांतच ही अभिनेत्री तिच्या शिक्षिकाच्या प्रेमात पडली आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली.
भूमिका चावला आणि भरत ठाकूर यांनी चार वर्षं आपलं नातं जगाच्या नजरेतून सुरक्षित ठेवलं होतं. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने 2007 मध्ये एका गुरुद्वारामध्ये लग्न केले.
लग्नाच्या जवळपास 7 वर्षानंतर या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. आज भूमिका तिच्या कौटुंबिक जीवनात सुखी असून. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आनंदाने काम करत आहे.