अशातच आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेब सिरीज याविषयी मत व्यक्त केलं आहे.
'किसी का भाई किसी कि जान' या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सलमान म्हणाला, 'कंटेंट जितका क्लीन, तितकं चांगलं'
पुढे सलमान खान म्हणाला कि, 'ओटीटी वरील कंटेंट सेन्सॉर व्हायला हवा. त्यातील शिवीगाळ आणि नग्नतेला आळा घालायला हवा.'
याच विषयी बोलताना सलमान खान पुढे म्हणाला कि, 'आता सगळ्यांकडेच स्मार्टफोन्स आहेत. तुमचे मुलंदेखील सोशल मीडियावर ते पाहतात. तुम्हाला चांगलं वाटेल का कि तुमची मुलं अशा गोष्टी सोशल मीडियावर पाहतात.'
यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी त्याच्या मताला सहमती दर्शवली आहे तर काही जण त्याला विरोध करत आहेत.
एका युजरने, 'काही नाही OTT मुळे ह्यांचा बाजार उठलाय कोण थेटर मध्ये जात नाही बघायला यांचे सिनेमे म्हणून बोलतोय हा' असं म्हटलंय तर दुसऱ्याने 'खरं आहे भाईजान असं म्हटलं आहे.