सध्या सगळेच दिवाळी सणाची जोरदार तयारी करण्यात बिझी आहेत. कलाकारही दिवाळीची तयारी करत आहेत. अभिनेत्री दिवाळीसाठी कोणता खास लुक करायचा याच्या विचारात आहेत. अशात अभिनेत्री रिंकू राजगुरूनं तिला दिवाळीला कसा लुक हवाय हे सांगितलं आहे. सध्या सर्वत्र नव्या ट्रेंडिंगचे आऊटफिट्स पाहायला मिळत आहेत. कलाकारही ते ट्रेंड्स आवर्जुन फॉलो करताना दिसतात. पण रिंकूला मात्र ट्रेंडिंग गोष्टी अजिबात करायच्या नाहीयेत. "ट्रेंडनं भरलेल्या जगात मला क्लासिक राहायचे आहे", असं रिंकू म्हणतेय. क्लासिक राहायचंय म्हणत रिंकूनं तिचा पारंपरिक लुक सर्वांबरोबर शेअर केला आहे. आता या दिवाळीत रिंकू ट्रेंडिंग लुकमध्ये दिसणार की क्लासिक हे पाहायला मिळणार आहे.