बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अफाट यश आणि लोकप्रियता मिळवून देखील सोशल मीडियापासून लांब राहणचं पसंत केलं आहे. या यादीत अनेक दिग्गज अभिनेत्रींच्या नावांचाही समावेश आहे. याबद्दलचं जाणून घेऊया..
या यादीमध्ये पहिलं नाव आहे आजच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रणबीर कपूरचं. जबरदस्त फॅन फॉलोइंग असूनही रणबीर कपूर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही. इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे राहूनही 'ब्रह्मास्त्र' फेम अभिनेत्याने आजपर्यंत इन्स्टाग्राम अकाऊंट काढलेले नाही.
राणी मुखर्जीने 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटातून जबरदस्त पुनरागमन केले आहे. राणी देखील इन्स्टाग्रामवर नाही. राणीने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करायला आवडत नाहीत. (फायल फोटो)
सोशल मीडियापासून दूर राहणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानयाच्या नावाचाही समावेश आहे. सोशल मीडियापासून दूर राहून तो आपल्या कामावर आणि वैयक्तिक आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो, असे सैफ अली खानचे मत आहे. (फायल फोटो)
जीनत अमान यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्रींनीही इन्स्टाग्रामवर अकाऊंट काढले आहे. तर 70 आणि 80 च्या दशकातील काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी आजपर्यंत सोशल मीडिया अकाऊंट काढलेले नाही.
अशीच एक अभिनेत्री म्हणजे लेजेंड रेखा. प्रत्येक पार्टीत दिसणाऱ्या रेखा सोशल मीडियापासून लांबच राहणं पसंत करतात.
जया बच्चन यांना मीडियापासून दूर राहणे आवडते हे सर्वांनाच माहित आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात, पत्नी जया सोशल मीडियापासून खूप दूर असतात. (फायल फोटो)