मराठी टेलिव्हिजनवर जशी आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. तर हिंदी टेलिव्हिजनवर अनुपमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
2020मध्ये अनुपमा ही मालिका सुरू झाली आहे. मालिका सुरू झाल्यापासून प्रत्येक आठवड्यात मालिका टीआरपीच्या शर्यतीत टॉपमध्ये राहिली आहे.
मालिकेतील अनुपमा म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगूली हिला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मालिकेनं नुकतेच 2 वर्ष पूर्ण केली. सेटवर मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं.
केक कटिंग करताना कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अभिनेत्री रुपाली गांगूलीला बाहेर आजही अनुपमा नावानं ओळखलं जात आहे. त्या विषयी बोलताना ती म्हणाली, 'राजन शाह तुम्ही जादुगार आहात मी तुमची आभारी आहे'.
'मी कुठेही गेले तरी लोक मला रुपालीऐवजी अनुपमा नावानं हाक मारतात याचा मला केवळ आनंद नाही तर अभिमान वाटतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच उत्साहानं मी कामावर परत येते'.
रुपाली गांगूली पुढे म्हणाली, '2016 मध्ये बाबा गेले. पण मी जेव्हा सेटवर येते तेव्हा मला इथे त्यांची उपस्थिती दिसते. त्यांचा भास होतो'.
'अनुपमाचा सेट म्हणजे माझं दुसरं घरच आहे. जवळपास रोज 12तास मी सेटवरच असते. इथे राहणं मला आवडतं. मालिकेला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार' .
अनुपमा मालिकेची हिंदी टेलिव्हिजनवर एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. स्टार प्लस वाहिनीवर अनुपमा रात्री 10 वाजता प्रसारित होते.