रुंजी या प्रसिद्ध मालिकेची नायिका अभिनेत्री पल्लवी पाटील सध्या चर्चेत आली आहे. या चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आहेत.
अभिनेत्री पल्लवी पाटीलनं 2016 साली अभिनेता संग्राम संमेळबरोबर लग्न केलं होतं. पण काही महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला.
दोघांच्या लग्नाच्या खूप चर्चा झाल्या होत्या. त्यांचा घटस्फोट हा त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होता. पण घटस्फोटाचं नेमकं कारण समोर आलं नव्हतं.
नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री पल्लवी पाटील हिनं घटस्फोटाच्या जवळपास 5 वर्षांनी खरं कारण चाहत्यांना सांगितलं.
पल्लवी म्हणाली, "माझं बालपण एका वेगळ्या कुटुंबात झालं. माझ्या आई वडिलांना बोलता आणि ऐकता येत नाही. त्यामुळे तिथे मी माझ्या घराची प्रमुख होते. मी माझ्या आई-वडिलांना सांभाळात होते. अचानक एका वेगळ्या घरात गेल्यानंतर मला ते वातावरण अवघड गेलं".
"मला तिथे जुळवून घ्यायला थोडा वेळ लागला. मी प्रयत्न केला. पण काही काळाने मी सर्व गोष्टींचा त्याग केला. मला ते जमणार नाही, असं मला वाटलं".
पल्लवी पुढे म्हणाली, "मला त्या सर्व गोष्टींचा सामना का करायचा, असा मी विचार केला. त्यामुळेच मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पुन्हा आई-बाबांबरोबर राहायला लागले. त्यावेळी मला समजलं की मी आई-वडिलांशिवाय राहू शकत नाही".