'बिग 14' विजेती रुबीना दिलेक ही तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. लग्नापूर्वी ती एका अभिनेत्याच्या अखंड प्रेमात होती. पण अचानक तिचा ब्रेकअप झाला.
रुबीनाची 'छोटी बहू' ही मालिका विशेष गाजली होती. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली होती. या मालिकेत तिने राधिकाची भूमिका साकारली होती. तर अभिनेता अविनाश सचदेवने देवची भूमिका साकारली होती.
रूबीनाने एकदा बॉलिवूड बबलला तिच्या रिलेशनशिपबाबत मुलाखत दिली होती. ती म्हणाली होती की, 'या ब्रेकअपने मला खूप वाईट वाटलं आणि मी जवळजवळ एक वर्ष यातून बाहेरच आले नव्हते, होतो. त्यावेळी मी स्वतःला आरशात पाहिल्यावर मला स्वतःलाच ओळखता येत नव्हत, इतकी वाईट अवस्था माझी झाली होती. तो माझ्या आयुष्यातील खूप कठीण काळ होता.
दुसरीकडे, अविनाश सचदेव सध्या बिग बॉस ओटीटीमध्ये दिसत आहेत. फलक नाझसोबत त्याची जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. रुबीनापासून विभक्त झाल्यानंतर अविनाशने 2015 मध्ये अभिनेत्री शामली देसाईसोबत लग्न केले, मात्र दोन वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.
ब्रेकअप नंतर रुबीनाने अभिनव शुक्लाशी लग्न केले. दोघांनीही बिग बॉस 14 मध्ये एंट्री केली होती. रुबीनाने बिग बॉस 14 ची ट्रॉफी जिंकली.