सैराट फेम रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. तसंच तिच्या कामाबद्दल देखील अपडेट शेअर करत असते. रिंकू राजगुरूनं नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं काळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. रिंकूचं साडी प्रेम सर्वांना परिचयाचे झाले आहे. अनेकदा ती साडी नेसून फोटोशूट करत असते. केसात गजरा आणि कपाळी टिकली, ना कुठला मेकअप आसा साधा आणि तितकाच रिंकूचा सुंदर लूक सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. चाहत्यांना तिचा हाच साधेपणा भावला आहे. रिंकूच्या साधेपणानं सर्वांचे लक्षवेधून घेतलं आहे. अनेकदा रिंकूच्या फोटोशूटची तुलना चाहते दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबत करत असते. रिंकूच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. रिंकू सध्या तिच्या फिटनेसमुळे देखील चर्चेत आहे.अनेकदा रिंकू तिच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसते. रिंकूचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. रिंकूनं मराठीसह बॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप सोडली आहे. तिला आजही सर्वजण सैराटाची आर्ची म्हणून ओळखतात. तिच्याबद्दल प्रत्येत गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ( फोटो साभार- रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम)