
अभिनेते अनिल कपूर यांची दुसरी मुलगी रिया कपूरचं लग्नं होत आहे. दरम्यान रिया करण बुलानीशी लग्न करत आहे. मात्र ते ८ वर्षांपूर्वीचं लग्नगाठ बांधणार होते. अगदी फिल्मी त्यांची लव्हस्टोरी आहे.

रिया चित्रपट निर्माती तसेच एका फॅशन ब्रँडची मालकही आहे. करण बूलानीला (Karan Boolani) ती एका चित्रपटाच्या सेटवरच भेटली होती.

2013 मध्येच दोघांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. तर ते सिरिअस रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं जात होतं.

२०१३ मध्येच करणचे आईबाबा मुंबईला आले होते. व तेव्हाच त्यांचं लग्नही होणार होतं. मात्र नंतर काही वैयक्तिक गोष्टींमुळे ते पुढे ढकलण्यात आलं.




