अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात पुन्हा नवं प्रेम फुलत आहे. रिया पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, रिया चक्रवर्ती मुंबईतील बंटी सजदेहला डेट करत आहे.
दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र अद्याप दोघांनाही त्यांचं नातं अधिकृत करायचं नाही.
बंटी सचदेह इंडस्ट्रीतील एक असा स्टार आहे ज्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. यादी पहा.
एक काळ असा होता की बंटी सचदेह आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांची नावे चर्चेत होती. या दोघांच्या लिंकअपच्या खूप चर्चा होत्या. दोघांना खूप वेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. नंतर या अभिनेत्रीचे नाव अभिनेता झहीर इक्बालसोबत जोडले जाऊ लागले.
बॉलिवूड स्टार सुष्मिता सेनचे नाव अनेकांसोबत जोडले गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने बंटी सचदेहलाही अनेक वर्षांपूर्वी डेट केले होते. मात्र, लवकरच त्यांचे नाते संपुष्टात आले.
एवढेच नाही तर बंटी सचदेहसोबत दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री समीरा रेड्डीचे नावही जोडले गेले आहे. बंटी सचदेह बॉलीवूड चित्रपटांमध्ये नशीब आजमावत असताना या अभिनेत्रीचे नाव त्याच्याशी जोडले गेले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंटी सचदेहचे नाव अभिनेत्री दिया मिर्झासोबतही जोडले गेले होते. दोघांनीही एकमेकांना डेट केल्याचे कळते.
काही बातम्यांनुसार अभिनेत्री नेहा धुपियानेही बंटी सचदेहला डेट केले आहे. अंगद बेदीशी लग्न करण्यापूर्वी नेहा धुपिया बंटी सचदेहच्या जवळच्या मैत्रिणी पैकी एक होती.