प्रसिद्ध रॅपर-गायक बादशाहची तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्याचं प्रत्येक गाणं सगळीकडे गाजतं. पण अशातच तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चात आला आहे.
बादशाहचा पूर्वी जस्मिन मसिहशी विवाह झाला होता, ज्याला जेसामी ग्रेस मसिह सिंग नावाची मुलगी आहे. 2020 मध्ये या जोडप्याने काही कारणांमुळे वेगळे केले जे कोणालाच माहित नाही.
मीडिया रिपोर्टनुसार या महिन्यात हे दोघे लग्न करणार असल्याचं त्यांच्या जवळच्या व्यक्तींनं सांगितलं होतं.
त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे कि, 'मी लग्न करत नाहीये. कृपया माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी अफवा पसरवू नका. तुम्हाला कोण अशा बातम्या सांगतं माहित नाही. पण माझ्याविषयी खोट्या बातम्या पसरवू नका.' अशी विनंती त्याने केली आहे.
बादशाहची गर्लफ्रेंड ईशा रिखी ही पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. पंजाबी सिनेसृष्टीच्या माध्यमातून ईशाने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिने 'जट्ट बॉयज पुट जट्टन दे','हॅपी गो लकी' आणि 'मेरे यार कमीने' सारख्या सिनेमांत काम केलं आहे.