स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेतील छोटी दीपिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. बालकलाकार स्पृहा दळी हिनं मालिकेत दीपिकाची भूमिका साकारली आहे. मालिकेत दीपा दीपिकाची आई आहे. पण दिपिकाची रिअल लाइफ आईही टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. स्पृहाला घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं आहे. दीपिकाची रिअल लाईफ म्हणजेच अभिनेत्री वेदश्री दळी. वेदश्री कलर्स मराठीवरील 'सुंदर आमचे घर' या मालिकेत काम करतेय. काव्याची जाऊ म्हणजेच प्रणाली वहिनींची भूमिका वेदश्रीनं साकारली आहे. काव्या आणि प्रणालीची जोडी प्रेक्षकांना आवडते. 'श्री स्वामी समर्थ', 'स्वराज्य रक्षक संभाजी' सारख्या मालिकेतही वेदश्रीनं काम केलं आहे. वेदश्री आणि स्पृहा या मायलेकी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात.