मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कामानं प्रेक्षकांचं मनं जिंकलं आहे. मात्र या इंडस्ट्रीमध्ये असा एक दिग्दर्शक होता ज्याच्यामुळं रस्ते , गल्ली-बोळं सगळी ओस पडत होते. रस्त्यावर एक चिटपाखरू देखील दिसत नव्हतं अशी स्थिती होती. ते लोकप्रिय दिग्दर्शक रामानंद सागर आहेत. ज्यांनी 'रामायण' (Ramayan) मालिकेती निर्मिकी केली. आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.
रामायण आणि रामानंद सागर यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावू शकतो की, कोरोना काळात रामायण मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली.
रामानंद सागर यांचे 12 डिसेंबर 2005 रोजी निधन झाले. पण, आजही ते प्रेक्षकांच्यात लोकप्रिय आहेत. एकेकाळी रामानंद सागर यांच्यामुळे शहरात 9 वाजल्यापासून कर्फ्यू लागायचा.
रामायणाचा पहिला भाग 25 जानेवारी 1987 रोजी आणि शेवटचा भाग 31 जुलै 1988 रोजी प्रसारित झाला होता. ही मालिका रविवारी दूरदर्शनवर 45मिनिटे (जाहिरातींसह) दाखवली जात असे.
त्याकाळात घऱोघरी टीव्ही नव्हत्या. त्यामुळं सर्वजण रामायण पाहण्यासाठी कामधंदा सोडून कोणाच्या तरी घरी तळ ठोकून बसत असे. सगळ्या मालिका 30 मिनिटाच्या स्लॉटमध्ये चालत असत.
सगळेजण मालिका पाहण्यासाठी दुकानं देखील बंद करत असतं. त्यामुळं रस्ते देखील रिकामे पडलेलं असतं. त्यामुळं शहरात सगळीकडं शांतता पसरलेली पाहायला मिळत.
रिपोर्ट्सनुसार, त्या काळातही जवळपास 10 कोटी लोक ही मालिका बघत असत. या मालिकेत अरुण गोविल रामाच्या भूमिकेत तर दीपिका चिखलिया सीतेच्या भूमिकेत दिसल्या होत्या. जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी धार्मिक मालिका म्हणून या मालिकेने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.