श्रीमंत बापाची बिघडलेली माजोरडी मुलगी रमा आणि पौरोहित्य सांभाळणाऱ्या सुसंस्कारी घरातील मुलगा राघव. अशा या दोन टोकाच्या व्यक्तीची प्रेम कहाणी मालिकेत दाखवण्यात आली आहे.
इतर मालिकांपेक्षा रमा-माधव ही मालिका वेगळी ठरत असल्याने प्रेक्षकही आवडीनं मालिका पाहताना दिसत आहेत.
महाशिवरात्री निमित्ता आयोजित केलेल्या पूजेसाठी रमा येते आणि तिच्या आई वडिलांचा लावलेला बोर्ड काढून टाकणाऱ्या राघवला धडा शिकवायचा निश्चय करते.
राघवचा द्वेष करणारी रमा यासगळ्यात राघवच्या प्रेमात पडणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.