राम चरण आणि उपासना यांनी लग्नाच्या 11 वर्षांनंतर मुलीला जन्म दिला आहे. त्यांच्या लेकीचं स्वागत खूपच भव्य झालं.
30 जून रोजी बाळाचं बारसं ठेवण्यात आलं होतं. उपासनाने इंस्टाग्रामवर शाही नामकरण सोहळ्याची झलक चाहत्यांना दाखवली होती.
या सोहळ्याला समारंभाला संपूर्ण मेगा परिवार उपस्थित होता. या सोहळ्याला अनेक सेलिब्रेटी उपस्थित राहिल्याचेही बोलले जात आहे.
अभिनेत्याच्या लेकीचं नाव काय असणार याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता अखेर या दोघांच्या मुलीचं नाव समोर आलं आहे.
या नावाचा अर्थ सांगताना उपासनाने हे नाव ललिता सहस्रनाम स्त्रोत्रातून घेतलेलं असून ते एक परिवर्तनकारी, शुद्ध करणारी ऊर्जा देत आध्यात्मिक जागृत करणारं असल्याचं सांगितलं आहे.
राम चरण आणि उपासना यांनी 20 जून रोजी त्यांच्या मुलीचे स्वागत केले. आजी-आजोबांपासून ते काकांपर्यंत, चिरंजीवीपासून अल्लू अर्जुनपर्यंत अनेकांनी हॉस्पिटलला भेट दिली आणि बाळाचा जन्म होताच तिला आशीर्वाद दिले.