वरुण तेज कोनिडेला हा दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. चिरंजीवी हा पवन कल्याणचा पुतण्या आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांच्या एंगेजमेंटच्या बातम्या येत होत्या. नुकतंच त्याने लावण्या त्रिपाठीसोबत एंगेजमेंट केली आहे. त्यांच्या साखरपुड्याची फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या दाक्षिणात्य जोडप्याला चाहते खूप शुभेच्छा देत आहेत.
या वर्षाच्या अखेरीस हे कपल लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. वरुण आणि लावण्या यांच्या एंगेजमेंटला त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. दाक्षिणात्य सुपरस्टार्स राम चरण, अल्लू अर्जुन आणि अल्लू अरविंद यांनी या सोहळ्याला खास हजेरी लावली होती
वरुण तेज 2017 मध्ये 'मिस्टर' या चित्रपटाच्या सेटवर लावण्या त्रिपाठीला भेटला होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची घट्ट मैत्री झाल्याचे बोलले जात आहे.
त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि ते डेट करू लागले. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते सोशल मीडियावर उघड करण्याऐवजी नेहमीच खाजगी ठेवले.
या जोडप्याच्या दुसर्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या नात्याची बातमी समोर आली. दोघेही अनेक पार्ट्यांसह अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर वरुण तेजने त्यांच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्याने १५ डिसेंबरला लावण्याच्या वाढदिवशी तिला प्रपोज केलं. तिनेही लग्नाला होकार दिला अन आता लवकरच दोघे लग्नगाठ बांधणार आहेत.
आता चाहते त्यांच्या लग्नासाठी खूपच उत्सुक आहेत. वरुण एक अभिनेता असून त्याने डझनभर चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता राम चरण, अल्लू अर्जुन, अल्लू सिरिशयांचा तो चुलत भाऊ आहे.