राहुल देशपांडे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांची मुलगी रेणुकासुद्धा चांगलीच लोकप्रिय आहे.
राहुल देशपांडे त्यांच्या गाण्याने चाहत्यांचं मन जिंकून घेतातच पण आज त्यांनी अनोखा उपक्रम केला आहे.
राहुल देशपांडे यांनी ही इको-फ्रेंडली गणेशमूर्ती ८०% कापूस-कागदाचा लगदा आणि २०% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केली आहे.
पुणे हँडमेड पेपर्स, आर्ट पुणे फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या रंगवा तुमचा कागदी बाप्पा या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देणाऱ्या उपक्रमात राहुल देशपांडे परिवारासोबत सहभागी झाले होते.
'उपक्रमात आज विद्यार्थ्यांसोबत कागदी बाप्पा स्वतः रंगवताना एक वेगळीच उर्जा जाणवली' असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना आपण सगळेच पर्यावरणाचे भान ठेवूयात असा संदेश त्यांनी चाहत्यांना दिला आहे.