प्रियांका सिद्धिविनायकाला आल्यानं तिच्यासाठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मंदिराच्या गाभाऱ्यातील संपूर्ण माहोल मालतीला आवडला असं दिसलं. कोणताही आवाज किंवा रडारड न करता अगदी शांतपणे मालतीनं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
सिद्धिविनायकला आलेली प्रियांका आपले संस्कार विसरली नाही. सुंदर पिस्ता कलरच्या ड्रेसमध्ये प्रियांका दर्शनला आली होती.