पडद्यावर सुंदर आणि ग्लॅमरस दिसणार्या हिरोईनचा लूक अनेक जण फॉलो करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, सुंदर दिसण्यासाठी काही बॉलिवूड अभिनेत्रींना सर्जरी करणं महागात पडलं आहे.बॉलिवूडच्या अनेक नायिकांनी कॉस्मेटिक सर्जरी करून लूक सुधारण्याचा निर्णय घेतला. तथापि, अनेक वेळा या पैजेचा उलट परिणाम झाला आणि लूक सुधारण्याऐवजी तो आणखी खराब झाला. चला जाणून घेऊया अशाच 5 नायिकांबद्दल ज्यांनी आपला लूक बदलण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केली आहे.
प्रियांका चोप्रा: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य केले असून तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. प्रियांका चोप्रा तिच्या सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयासाठी देखील ओळखली जाते. प्रियांका ही एकमेव बॉलिवूड नायिका आहे जिने हॉलिवूडच्या मोठ्या शोमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. यासोबतच प्रियांका चोप्रानेही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रियांका चोप्रानेही तिच्या नाकाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. हे सत्य प्रियांकाने स्वतः मान्य केले होते. काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत प्रियाकांने सांगितले होते, 'माझी शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी माझ्या नोज ब्रिज कापला होता. यानंतर, ते ठीक करण्यासाठी त्यांच्यावर अनेक वेळा शस्त्रक्रिया करावी लागली. मग काही काळानं सर्व काही ठीक झाले.
अनुष्का शर्मा : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. अनुष्काने तिच्या उत्कृष्ट लूक आणि दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. पण अनुष्का शर्मालाही तिच्या ओठांच्या शस्त्रक्रियेबाबत ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. ओठांच्या शस्त्रक्रिये नंतरचा लूक चाहत्यांना अजिबात आवडला नाही. याबाबत अनुष्का शर्माने स्वतः सांगितले होते की, 'बॉम्बे बैलवेट' च्या शूटिंगदरम्यान मी टेम्पररी लिप एनहांसिंग टूल वापरला होता. मला कोणापासून काही लपवायची गरज नाही. पण यावरून तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
कतरिना कैफ : बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीचे नाव घेतल्यास कतरिना कैफचे नाव सर्वात आधी येईल. लग्नानंतरही लोकांमध्ये कतरिना कैफची क्रेझ कमी झालेली नाही. पण कतरिना कैफलाही कॉस्मेटिक सर्जरीसाठी खूप ट्रोल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर फोटोंची तुलना करताना चाहत्यांनी सांगितले की, कॉस्मेटिक सर्जरीनंतर कॅटरिनाचा लूक खराब झाला आहे. कतरिना कैफ मात्र याविषयी कधीच उघडपणे बोलली नाही. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)
सारा खान : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सारा खानलाही कॉस्मेटिक सर्जरी करणं महागात पडलं. टीव्हीची सर्वात सुंदर हिरोईन गणली जाणारी अभिनेत्री सारा खान हिनेही आपल्या ओठांची शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रियेनंतर सारा खानचा लूकही खूप बदलला होता. या शस्त्रक्रियेनंतर साराला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. सारा खानने याबाबत सांगितले होते की, तिला तिचा हा नवा लूक खूप आवडला आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)
आयशा टाकिया: वॉन्टेड, टार्झन द वंडर कार यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या आयशा टाकियालाही तिच्या ओठांची कॉस्मेटिक सर्जरी केल्यावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. आयशाच्या दोन्ही फोटोंची तुलना करताना लोकांनी तिचा लूक खराब करण्याबाबत बरेच काही सांगितले होते. याबाबत आयेशा टाकिया म्हणाली होती की, 'हे सगळं वाचताना मी माझ्या कुटुंबासोबत गोव्यात होते. पण हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. लोकांनी मला याबद्दल सांगू नये. शस्त्रक्रियेनंतर आयशा टाकियाचा लूकही खूप बदलला आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)