शराबी हा सिनेमा 2 तास 56 मिनिटांचा आहे. 18 मे 1984मध्ये सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमात अमिताभ बच्चन, जयाप्रदा, ओम प्रकाश, प्राण, रंजीत, चंद्रशेखर, सीएस दुबे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.
प्रकाश मेहरा हे परफेक्शनिस्ट दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. सिनेमातील एका सीनसाठी त्यांनी अमिताभ बच्चनकडून इतके वेळा करून घेतला की बिग बींवर ही नको म्हणण्याची वेळ आली होती.
सिनेमातील एक सीन प्रकाश मेहरा यांनी बिग बींकडून 45 वेळा करून घेतला होता. एका सीनसाठी 45 रिटेक झाले होते.
प्रकाश मेहरा यांनी त्यांच्या मनासारखा शॉर्ट होत नाही तोवर रिटेक वर रिकेट घेतले. 2 तासात 45 रिटेक घेतल्यानंतर 46 टेक त्यांना ओके वाटला.
सिनेमातील त्या सीनचा तो डायवलॉग नंतर इतका हिट झाला की आज 34 वर्षांनी देखील प्रेक्षकांना तो डायलॉग लक्षात आहे.
कॉमेडी ड्रामा असलेल्या या सिनेमातून अमिताभ आणि जया प्रदा यांची जोडी एका रात्रीत हिट झाली होती. हा सिनेमा लक्षात राहण्यासारखा आहे आणि त्यासाठी प्रकाश मेहरा यांनी खूप मेहनत घेतली.
जंजीर सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं. या सिनेमानं छप्पर तोड कमाई केल्यानंतर शराबी हा त्यांचा सहावा सिनेमा होता.