कॉमेडीच्या कमाल टायमिंगनं प्रेक्षकांना हसवणारे अभिनेता समीर चौघुले आज त्यांचा 50वा वाढदिवस साजरा करत आहेत.
संपूर्ण सिनेसृष्टीतून समीर चौघुलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीनं त्यांना खास शुभेच्छा दिल्यात.
पोस्ट लिहित प्राजक्तानं म्हटलंय, "दुग्धशर्करा योग..! आषाढी एकादशीला तूझा ५० वा वाढदिवस आला. खरचं, सगळ्या जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूतच आहेस".
"तुझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली. आणि मी “वाह् दादा वाह् fame- प्राजक्ता” झाले आणि ही ओळख आयूष्यभर राहील, असं वाटतं"
"तू अतिशय कष्टाळू, नम्र, भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस. तूला आत्तापर्यंत मिळालेलं यश,प्रेम ही तर फक्त सुरूवात ठरो".
"इथून पुढे देवाचा आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुव्वाधार बरसत राहो; ह्याच तूला 50व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!"
प्राजक्ता आणि समीर यांच्यात खूप छान मैत्री आहे हे सर्वांना माहिती आहे. या पोस्टनिमित्तानं त्यांच्यातील त्यांच्यातील बॉन्डिंग देखील लक्षात आलं.