साऊथ सुपरस्टार अभिनेता प्रभास आदिपुरूष सिनेमामुळे चर्चेत होता. लवकरच त्याचा सालार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रभास नेहमीच त्याच्या चाहत्यांना कामाचे अपडेट्स देत असतो. पण सोशल मीडियावर प्रभासला मोठा फटका बसला आहे.
प्रभासच्या फेसबुक अकाउंटवरून काही व्हिडीओ शेअर झाले आहेत. जे प्रभासच्या पर्सनॅलिटीच्या अगदी विरुद्ध आहेत.
प्रभासच्या फेसबुक पेजवर व्हायरल होत असलेले व्हिडीओ 'अनलकी ह्युमन्स', 'बॉल फेल्स अराउंड द वर्ल्ड' अशा टायटल सह शेअर होत आहेत.
हे व्हिडीओ पाहून प्रभासला ट्रोल करण्यात आलं. मात्र ट्रोलिंगनंतर प्रभासनं पोस्ट शेअर करत सतत्या सर्वांसमोर आणली आहे.
अभिनेता प्रभासचं फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. त्यानं स्वत: ट्विटरवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
प्रभासच्या हॅक झालेल्या फेसबुक अकाउंटवरून नको त्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. त्या पोस्टचे स्क्रिनशॉर्ट्ही प्रभासनं शेअर केले आहेत.
"हॅलो, माझं फेसमबुक पेज हॅक झालं आहे. माझी टीम हा प्रॉब्लेम सॉल करत आहे". या कॅप्शनसह प्रभासने त्याच्या फेसबुक पेजवर शेअर होत असलेल्या व्हिडीओचे स्क्रिन शॉर्ट शेअर केलेत.