परिणीतीच्या लग्नाची दणक्यात तयारी सुरु? साखरपुड्याच्या चर्चांमध्ये मनीष मल्होत्राच्या घरी पोहचली अभिनेत्री
बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. परिणीती एका राजकीय नेत्याच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. एवढंच नाही तर दोघांचं लग्नही ठरल्याचं बोललं जातंय. त्यातचं आता या दोघांच्या नात्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे.
बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. परिणीती एका राजकीय नेत्याच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
2/ 8
परिणिती चोप्रा लवकरच आपचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
3/ 8
लग्नाच्या चर्चांदरम्यानच काल परिणीती बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी पोहचली होती. तिच्यासोबत नुकतेच लग्न झालेले नवविवाहित सिद्धार्थ आणि कियारा देखील होते.
4/ 8
त्यामुळे परिणीती लग्नाच्या तयारीसाठी मनीष मल्होत्राच्या घरी पोहचली असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.
5/ 8
कियाराने तिच्या लग्नाच्या कपड्यांसाठी मनीष मल्होत्राची निवड केली होती. त्यामुळे आता तिच्यानंतर परिणीती सुद्धा याच कारणासाठी तिथे गेल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
6/ 8
त्यामुळे आता सीड कियारा नंतर परिणीती सुद्धा राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
7/ 8
गेल्या आठवड्यात बुधवारी परिणिती आणि आपचे खासदार राघव चड्ढा मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर डिनरला जाताना स्पॉट झाले होते. एकाच गाडीतून दोघेही एकत्र या लंच आणि डिनर डेटसाठी जाताना स्पॉट झाले आणि त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या.
8/ 8
हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण त्यावर या दोघांनी अजूनही मौन बाळगलं आहे.