उडिया फेम अभिनेत्री रुचिस्मितानं 26 मार्चला आत्महत्या करत आयुष्य संपवलं. अभिनेत्री तिच्या मामाच्या घरी मृतावस्थेत सापडली.
अभिनेत्रीचा मृतदेह संशयास्पदरित्या मामाच्या घरी आढळून आला आहे. अभिनेत्रीची आत्महत्या की घातपात याचा पोलीस तपास घेत आहेत.
रुचिस्मिताचा मृत्यू की हत्या हे गुढ सुरू असताना आता तिच्या आईनं या प्रकरणात महत्त्वाचा खुलासा केला आहे.
प्रसिद्ध गायिका असलेल्या अभिनेत्रीच्या आईनं सांगितलं, "शनिवारी रात्री रुचिस्मिता आणि माझ्यात आलू पराठ्यांवरून भांडण झालं होतं. मी तिला रात्री 8 वाजता आलू पराठे बनवायला सांगितले होते पण तिनं मी रात्री 10 वाजता बनवेन असं सांगितलं. त्यावरून आमच्यात वाद झाला होता".
आईच्या खुलास्यानंतर अभिनेत्रीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी देखील मृत्यूआधी अभिनेत्रीचं कुटुंबाबरोबर मोठं भांडण झालं होतं, असं सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रूचिस्मितानं याआधीही अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
रुचिस्मिता गुरु उडीसाची लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका होती. तिनं अनेक उडिया गाण्यांच्या अल्बममध्ये काम केलं होतं.
रुचिस्मिता मूळची बलंगार शहरातील तळपालीपाडा या गावची रहिवाशी होती. रुचिस्मिता अनेक स्टेज शो देखील करायची.