नेहा पेंडसेने 2020 मध्ये शार्दूल सिंग बायस सोबत नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्काच बसला होता.
शार्दूलची नेहाआधी दोन लग्न झाली होती. त्याचा दोनदा घटस्फोट झाला असून त्याने नेहासोबत तिसऱ्यांदा लग्न केलं तर नेहाचं हे पाहिलंच लग्न होतं. त्यामुळं नेहाला बरंच ट्रोल देखील करण्यात आलं.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत नेहाने तिचे वैवाहिक आयुष्य कसे चालू आहे असं विचारलं असता तिने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. नेहा म्हणाली की, ''कोणतेही लग्न हे तडजोडीशिवाय टिकत नाही आणि लग्नानंतर तडजोड ही बायकांनाच करावी लागते. माझं लग्न झाल्यानंतरही मीच तडजोड करते. तो काही करत नाही.''
ती पुढे म्हणाली, ''पण तुम्ही या तडजोडी तेव्हाच करु शकता, जेव्हा तुमचा समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. तुमचे त्याच्यावर प्रेम असते. तुम्हाला त्याच्याबद्दल खात्री असते.''
याविषयीच बोलताना नेहाने पुढे सांगितलं की, ''जेव्हा तुम्हाला समतोल राखता येतो तेव्हाच एखाद्या स्त्रीला या गोष्टी फार सोप्या होतात. मग त्यावेळी स्त्रियांना तडजोड करणं फार सोपं होतं. ठिक आहे तो सांभाळून घेतो ना, ठिक आहे ना तो करतो ना, असं ठिक आहे, ठिक आहे म्हणतच आमचा साडेतीन वर्षांचा संसार अजूनही सुरु आहे.''
नेहाने या मुलाखतीत दोघांचे स्वभाव एकदम विरुद्ध असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, 'त्याला सगळं जंक फूड आवडत तर मला सगळं हेल्दी फूड आवडतं. मी खूप शिस्तप्रिय आहे तर तो बेशिस्त आहे. पण संसार करण्यासाठी अशाच दोन व्यक्तींची गरज असते.'' असं नेहा म्हणाली.