या मालिकेत आनंदी आणि राघवची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. तसेच रमाने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
‘नवा गडी नवा राज्य ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.
आता एवढ्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आनंदी राघव एकत्र येणार आहेत. आणि रमाचा या दोघांना वेगळं करण्याचा डाव फसणार आहे.
रमाला ट्रोल करत एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, 'भुताचे पण काही limitations दाखवाल की नाही???पत्र काय लिहते...डोळ्याने आग काय विझवते .? रिक्षा काय चालवते ??पोरखेळ दाखवायचा असेल तर निदान comedy level var तरी ठेवा ....लेखक कन्फ्युज दिसतोय...'
तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने 'रमा कायमचा मोक्ष द्या आणि आमची सुटका करा. ती गोड आनंदी बघायला किती छान वाटतं.पण ही बया आली की टीव्हीवर काही तरी फेकून मारावं असं वाटतं.' तसेच 'खूप कंटाळवाणी सुरु आहे मालिका' अशा कमेंट केल्या आहेत.
आता येणाऱ्या काळात पालिकेत ट्विस्ट येणार असले तरी प्रेक्षकांचा त्याला कितपत पाठींबा मिळतोय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.