फॅंड्री, सैराट, नाळ यांसारख्या सुपरहिट सिनेमानंतर नागराज मंजुळे घर बंदूक बिरयाणी हा नवा सिनेमा घेऊन आले आहेत.
सिनेमात अभिनेते सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे.
सिनेमाची रिलीज डेट पुढे का ढकलली असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर याचं कारण हिंदी सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे.
घर बंदूक बिरयाणी सिनेमा रिलीज डेट पुढे ढकलण्याचं कारण जरी नागराज यांनी सांगितलं नसलं तर भोला सिनेमामुळे तारीख पुढे ढकलल्याचं बोललं जात आहे.
नागराज मंजुळेंनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. घर बंदूक बिरयाणी हा सिनेमा आता 7 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.