तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमधील बबीताजी अर्थात मुनमुन दत्ता या सुंदरीने अनेकांच्या मनात घर केलं आहे. ज्यामध्ये मालिकेतला जेठालाल तिच्या प्रेमात असतो त्याप्रमाणेच अनेक चाहते तिच्या प्रेमात आहेत. मुनमुन दत्ता जशी ऑन स्क्रीन अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस आहे तशीच ती रिअल लाइफमध्येही तेवढीच हॉट आणि बोल्ड आहे. मुनमुन सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. मुनमुनने आत्ताही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे अतिशय व्हायरल झाले आहेत.
ब्लू ड्रेसमधील मुनमुनच्या फोटोंना अनेक चाहत्यांनी पसंत केलं आहे. यात तिची हेअरस्टाईलही अत्यंत साजेशी दिसत आहे.
मालिका सुरू झाल्यापासून मुनमुन या मालिकेत काम करते. जेठालाल आणि दयाबेन प्रमाणाचे बबीता आणि अय्यरची जोडी देखील हीट झाली आहे. देशभरात मुनमुनचे अनेक फॅन्स आहेत.
36 वर्षांची ही सुंदरी अद्यापही सिंगल आहे. एका मीडियारिपोर्टनुसार मुनमुन दत्ता एका एपिसोडसाठी सुमारे 40,000 हजार रुपये मानधन घेते.