आलियाच्या या ब्रँडचे कपडे बॉलिवूडसहितच तिच्या चाहत्यांमध्येही लोकप्रिय आहेत. ही कंपनी मुख्यतः लहान मुलांचे आणि प्रेग्नंन्सी मध्ये असलेल्या स्त्रियांसाठी कपडे बनवते.
एक मोठा उद्योजक तिची कंपनी विकत घेणार असल्याची माहिती आहे. लवकरच ही कंपनी प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची कंपनी अड-ए-मम्मा खरेदी करू शकते.
एक मोठा उद्योजक आलिया भट्टची ही कंपनी तब्बल 300 ते 350 कोटी रुपयांना विकत घेणार असल्याची चर्चा आहे.
आलिया भट्टच्या चाहत्यांमध्ये या गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली असली तरी याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलियाचा Add-e-Mamma हा 150 कोटी रुपयांचा ब्रँड असून ते कपडे प्रामुख्याने ऑनलाइन विकले जातात.