झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ' संपणार असल्याची माहिती समोर आली होती. नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच आता माझी तुझी रेशीमगाठ संपणार असं प्रेक्षकांनी गृहीत धरलं होतं.
लोकप्रियतेच्या शिखरावर हि मालिका अचानक मालिका बंद होण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मालिकेचे चाहते नाराज झाले होते.
मात्र आता प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आहे ती म्हणजे टीआरपीमध्ये टॉप टेन मध्ये असलेली मालिका माझी तुझी रेशीमगाठ संपणार नाहीये.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यातले शूटिंग केल्याची पोस्ट कलाकारांनी सोशल मीडियावर शेयर केल्या. या पोस्टनंतर अनेक प्रेक्षकांनी मालिका बंद होण्याबाबत प्रश्न विचारले.सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
मालिकेच्या अगदी शेवटच्या भागाचं शूटिंग झाल्याच्या बातम्याही आल्या. तसे व्हिडिओही शेअर केले गेले. पण आता निर्माते आणि वाहिनीनं निर्णय बदलल्यानं सूत्रांच्या माहितीनुसार उद्यापासून शूटिंग सुरू होत आहे.