मालिका विश्वात आपल्या स्मितहास्याच्या आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांचं मन जिंकलेल्या मयुरी देशमुखचा जन्म 3 सप्टेंबर 1992 रोजी धुळे, महाराष्ट्र येथे झाला.
मयुरी देशमुखने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या डेंटल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. पण नंतर अभिनयात करिअर करण्याच्या इच्छेने तिला स्वस्थ बसू दिले नाही
'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील मयुरीची भूमिका लोकप्रिय असली तरी तिने एका चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होत.
मयुरी देशमुखने आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून केली होती. तिने नाना पाटेकर यांच्यासोबत 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या मराठी चित्रपटात काम केले होते.
एकिकडे मालिकेला मिळालेलं यश आणि सुखी संसारात रमलेल्या मयुरीच्या आयुष्यात असं एक वादळ आलं ज्यामुळं तिचं पुरतं आयुष्य बदलून गेलं.
पतीच्या निधनानंतर मयुरीच्या जीवनात एक वेगळं वळण आलं. या धक्क्यामुळे ती पुरती खचली होती. पण वेळीच सावरत तिने मालिकविश्वात कमबॅक केलं.
पतीच्या निधनानंतर मयुरीने स्टार प्लस वरील 'इमली' या मालिकेद्वारे हिंदी मालिका विश्वात पदार्पण केलं.
मयुरी देशमुख हिनं फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. आज तिच्या वाढदिवशी तिच्या धैर्याबद्दल तिचे अभिनंदन करून तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊया.