झी मराठीवरील मालिका 'माझा होशील ना' च्या सेटवर कलाकारांनी आमरस आणि मिसळची जंगी पार्टी केली आहे. यावेळी सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडेने डाएट वगैरेचा फारसा विचार न करता आमरसचा मनसोक्त आनंद लुटला. सध्या लॉकडाऊनमुळे परराज्यात शुटींग चालू आहे. आणि सर्व कलाकार महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. आणि महाराष्ट्रात आंब्यांचं सिझन सुरु आहे. कलाकरही आंब्याचा आनंद घेण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी खास सेटवरच आमरसची पार्टी करण्यात आली. आमरससोबतचं मिसळचाही बेत आखण्यात आला होता. आपल्या आवडत्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारल्याने, कलाकारांचाही आनंद द्विगुणीत झाला होता. माझा होशील ना मालिकेतील कलाकार नेहमीच ऑफस्क्रीन मस्ती करत असतात. सध्या सर्व कलाकार शुटींगनिमित्ताने महाराष्ट्रातून बाहेर आहेत, त्यामुळे सतत आपल्या घरातील जेवणाला मिस करत असतात. म्हणूनच सेटवर त्यांच्या जेवणाची पूर्ण काळजी घेतली जाते. सध्या मालिकेत जरी हे लोक गंभीर असले, तरी ऑफस्क्रीन खुपचं मजेत आहेत.