मराठी कलाकारांचा डंका सध्या अमेरिकेत वाजताना दिसत आहे. अटलांटा सिटीमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाच्या झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावत आपला कलाविष्कार सादर केला.
हेमांगी कवीने आज शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नऊवारी साडीच्या पोशाखात दिसत आहे. हेमांगी सुद्धा या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाली होती.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सुद्धा अमेरिकेत झालेल्या या मराठमोळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती. यावेळी सोनालीने तिरंग्याच्या रंगाची सुंदर साडी परिधान करून काही फोटो शेअर केले.
या कार्यक्रमात लीना भागवत यांच्या आमने-सामने नाटकाचा प्रयोगसुद्धा रंगला. अमेरिकेत लीना आणि मंगेश या कपलने सुंदर फोटो सुद्धा शेअर केला. या नाटकाच्या प्रयोगानंतर लीना भावुक झाल्याचं दिसून आलं.
हेमांगीने अमेरिकेत जमलेल्या सगळ्या कलाकारांचा एक फोटोसुद्धा शेअर केला होता. यामध्ये पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, मृण्मयी देशपांडे, सावनी रवींद्र अशा अनेक कलाकारांचा समावेश होता.
चंद्रमुखी सिनेमात नृत्यदिग्दर्शिका म्हणून ज्यांनी काम पाहिलं अशा दिली विचारे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण होतं शंकर महादेवन यांचं गाणं. त्यांच्या मधुर आवाजाने त्यांनी माहोल तयार केल्याचं बघायला मिळालं. सौजन्य- झी ग्लोबल
या सगळ्या कलाकारांनी मिळून अमेरिकेत असणाऱ्या मराठी बांधवांसोबत भारतीय असण्याची भावना जागृत ठेवत स्वातंत्र्यदिनाच्या आधी खूप मोठं सेलिब्रेशन केल्याचं बघायला मिळालं.