सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. भर उन्हात सोनाली कुलकर्णीनं जाळीदार फ्रॉकमध्ये चक्क वाळवंटात फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये सोनालीनं चिकनचा पांढऱ्या रंगाचा सुंदर फ्रॉक घातला आहे, तिच्या या फोटोशूटनं भर उन्हात सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव करत याला पसंती दर्शवली आहे. एकापेक्षा एक अशा किलर पोझ देताना सोनाली दिसत आहे. तिचा हा हॉट अंदाज चाहत्यांना देखील आवडला आहे. ( फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)