मराठी सिनेसृष्टीसाठी प्राजक्ता माळी हे नाव आता नवं राहीलं नाही. तर आपल्या अभिनयाने आणि हटके लूक्स ने ती चाहत्यांचं नेहमीच लक्ष वेधून घेते.
या फोटोमध्ये अभिनेत्री निळ्या रंगाच्या भरजरी साडीमध्ये दिसून येत आहे. प्राजक्ताच्या एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे,' काय गोड दिसतेस प्राजु तुझ्या डोळ्यात जी नशा आहे ना ती भांगमध्येपण नाहीय'.
साडीसोबत केसांत माळलेली फुले आणि ट्रॅडिशनल दागिने यामुळे अभिनेत्रीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत आहे.
नुकतंच प्राजक्ता माळी आपल्या आईसोबत दुबई ट्रीपला गेलेली होती. या ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.