अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा पोलिसांच्या ताब्यात आहे. अश्लिल चित्रफिती प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तर कोर्टात सुनावनीही सुरू आहे. पण या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे. तर आता एका मराठी अभिनेत्रीनेही खळबळजनक दावा केला आहे.
मराठी अभिनेत्री मनिषा केळकरने हा दावा केला असून तिलाही राज कुंद्राकडून ऑफर आली होती, असं तिचं म्हणणं आहे.
तिने म्हटलं आहे की, "राज कुंद्रा प्राॅडक्शन हाऊसने माझ्याकडे फोटो व्हिडिओ मागितले होते मोठं नाव असल्याने मी गेले तिथल्या मोठ्या पदाधिका-यांना भेटले देखील होते."
त्यांनी मला शुटींगची ॲाफर दिली पण नेमके चित्रिकरण काय केले जाणार? थिम काय आहे? स्टोरी काय आहे? असे अनेक प्रश्न केल्यावर कोणतचं उत्तर तिला मिळालं नाही.
"पण त्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नाहीत त्यामुळे मी ॲाफर नाकारली. पण एका दृष्टिने बरच झालं मी ॲाफर नाकारली नाही तर मी ही या पाॅर्न फिल्म्सच्या जाळ्यात अडकले असते." असा खुलासा मराठी अभिनेत्री मनिषा केळकरने केला आहे.
दरम्यान राज कुंद्राला अटक झाल्यापासून अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन त्यांना ऑफर आली होती हे सांगितलं आहे.
अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पुनम पांडे यांनी सर्वात आधी राज कुंद्रावर आरोप केले होते. तर तब्बल ५ महिन्यांनंतर राजला अटक करण्यात आली होती.