अभिनेत्री मानसी नाईक सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवरा प्रदीप खरेराबरोबर घटस्फोट घेत असल्याचा खुलासा केल्यानंतर मानसी आणि प्रदीप यांच्यात सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. या सगळ्यात मानसीनं स्वत:ला फार चांगलं सांभाळलं असून ती तिच्या कामाकडे फोकस करताना दिसतेय. मानसीचं फोटोशूट सोशल मीडियावर सातत्यानं पाहायला मिळत असतं. मानसीनं नव्या वर्षातील पहिल्या सणासाठी सुंदर तयारी केली आहे. चंदेरी काठाच्या काळ्या साडीत मानसीनं सुंदर लुक क्रिएट केलाय. 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार', म्हणत मानसीनं सक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यात. सोबत सुंदर कविता शेअर केलीये. मानसीच्या या लुकला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.