1998 साली प्रदर्शित झालेला 'दिल से' हा चित्रपट मणिरत्नमच्या आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. हा तोच चित्रपट आहे, ज्याद्वारे मणिरत्नम यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीतून बाहेर पडून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. हे जाणून आश्चर्य वाटेल की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फ्लॉप झाला परंतु जपान, अमेरिका, यूके आणि इतर अनेक देशांमध्ये प्रचंड प्रेक्षक मिळवण्यात यशस्वी झाला.
बॉलीवूडच्या क्लासिक कल्ट चित्रपटांमध्ये त्याचा समावेश होतो. या चित्रपटात शाहरुख खान, मनीषा कोईराला आणि प्रीती झिंटा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रिती झिंटाचा हा डेब्यू चित्रपट होता. याशिवाय मलायका अरोरानेही याच चित्रपटातील 'छैय्या छैय्या' या गाण्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करून प्रेक्षकांना प्रभावित केले.
या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या मनीषा-प्रिती या मणिरत्नमची पहिली पसंती नव्हती. तर मलायका 'छैय्या छैय्या' गाण्याने रातोरात स्टार बनली. हे गाणे पहिल्यांदा शिल्पा शिरोडकरला ऑफर करण्यात आले होते पण तिच्या जास्त वजनामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक मणिरत्नम यांनी तिला या गाण्यातून काढून टाकले. आणि त्यामुळे मलायकाचे नशीब चमकले.
IMDB.com च्या रिपोर्टनुसार, अमरकांत वर्मासाठी शाहरुख खान चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाची पहिली पसंती होती. या सिनेमासाठी काजोल पहिली पसंत होती. त्याकाळात काजोल आणि शाहरुखच्या जोडीला खूप मागणी होती आणि मणिरत्नमला तिलाच सिनेमात घ्यायचे होते. पण, तारखांच्या समस्येमुळे काजोलला हा सिनेमा करता आला नाही. काजोल या सिनेमातून च्या बाहेर पडल्यानंतर ही भूमिका मनीषाला ऑफर झाली. पुढे मेघनाची भूमिका करून मनीषा कोईराला स्टार बनली.
असेच काहीसे नवोदित अभिनेत्री प्रीती झिंटाच्या बाबतीत घडले. रिपोर्ट्सनुसार, सेकंड लीड कास्टसाठी मणिरत्नमची पहिली पसंती प्रिती नायरच्या भूमिकेसाय़ी अभिनेत्री सिमरन बग्गा होती, परंतु काही कारणांमुळे सिमरन या चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही, त्यानंतर ही भूमिका राणी मुखर्जीला ऑफर करण्यात आली परंतु राणीने चित्रपट करण्यास नकार दिला. राणीने नकार दिल्यानंतर ही भूमिका प्रिती झिंटाने साकारली आणि त्यामुळे प्रितीच्या रूपाने बॉलिवूडला एक नवी अभिनेत्री मिळाली. जर राणी-काजोल या चित्रपटासाठी राजी झाल्या असत्या तर मनीषा आणि प्रीती कधीच हा चित्रपट करू शकल्या नसत्या.
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 1998 साली 11 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 10.76 कोटींची कमाई करू शकला. तर त्याचे जागतिक कलेक्शन 28.26 कोटी रुपये झाले होते.
हा चित्रपट राम गोपाल वर्मा आणि शेखर कपूर यांनी संयुक्तपणे तयार केला होता. या चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिली होतं. चित्रपटात एकूण 5 गाणी होती आणि सर्व गाणी सुपरहिट झाली. विशेषतः चित्रपटातील 'छैय्या छैय्या' हे गाणे त्या वर्षी खूप गाजले.