नुकताच मेहंदी कार्यक्रम पार पडला. इंद्राने त्याच्या हातावर त्याच्या लाडक्या दीपिका मॅडमचं नाव काढलं.
दीपूच्या गोऱ्या गोऱ्या गाली इंद्राच्या नावाची हळद लागली आहे. हळदीला दीपू भावूकही झाल्याच पाहायला मिळत आहे.
दोघांचं लग्न दाक्षिणात्य पद्धतीनं होणार आहे. त्या आधी हळदीला देखील साऊथ इंडियन टच इंद्रा आणि दीपूच्या लुकमध्ये पाहायला मिळतोय.
दीपूने सफेद साडी आणि त्यावर हिरवं ब्लॉऊज मॅचिंग केलं आहे. तिच्या साडीच्या किनारीला गोल्डन रंगाची हटके किनार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.