इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू यांचा समावेश आहे. तो लक्जरी जीवन जगतो.
महेश बाबूनं नवीन रेंज रोवर एसवी विकत घेतली आहे. महेश बाबूनं खरेदी केलेल्या या रेंज रोव्हरची किंमत ही 5.4 कोटी रुपये आहे.
रेंज रोव्हर ही सेलिब्रिटींची आवडती कार आहे. दक्षिणेतील मोहनलाल, ज्युनियर एनटीआर, चिरंजीवी या सुपरस्टार या गाडीचे मालक आहेत.
पण महेश बाबूची कार ही त्या सगळ्यांपेक्षा वेगळी असून खूप खास आहे. महेश बाबूनं घेतलेली ही कार हैद्राबादमध्ये असलेल्या या सगळ्या कारच्या तुलनेत वेगळी आहे.
महेश बाबूने खरेदी केलेल्या या कारची संपूर्ण फिनिशिंग ही गोल्डची आहे. त्यामुळे त्या रंगाची ती एकमेव कार आहे.
सध्या भारतात उपलब्ध असलेल्या सगळ्या कारच्या तुलनेत ती वेगळी कार आहे. त्यासोबत ही लिमिटेड अडीशन असलेल्या गाड्यांपैकी एक आहे.